गलतीकरांस

1 2 3 4 5 6


धडा 6

बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण तेसौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वत:कडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये.
2 एकमेकांची ओझी वाहा.अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.
3 कारण जर कोणी स्वत:ला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी,तर तो स्वत:जी फसवणूक करुन घेतो.
4 प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वत:ची इतरांबरोबर तुलनान करता स्वत:विषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल.
5 कारण प्रत्येकाला त्याची स्वत:ची जबाबदारी असलीचपाहिजे.
6 ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
7 तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल.
8 जो कोणीआपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्यालाआत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपणआळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल.
10 तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्वलोकांचे आणि विशेषत: ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
11 पाहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत.
12 ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हांला सुंता करुन घेण्याची सक्तीकरतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये.
13 परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्रपाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारतायावी.
14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जगवधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
15 कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवीउत्पति हीच महत्त्वाची आहे.
16 तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दयाअसो.
17 आता इथून पुढे मी एवढेच मागतो की, यापुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्याशरीरावर धारण केलेल्या आहेत.
18 बंधूनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.