विश्रांती


  • परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत:तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
    निर्गम 33:14
  • शौल त्याचा नोकर आणि शमुवेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्हायला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.
    1 शमुवेल 9:27
  • आसा यहूदातील लोकांना म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहात आहोत, तेव्हाच हे करु. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
    2 इतिहास 14:7
  • जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
    स्तोत्रसंहिता 4:4
  • परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.
    स्तोत्रसंहिता 27:14
  • परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
    स्तोत्रसंहिता 37:7
  • मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.
    स्तोत्रसंहिता 40:1
  • देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”
    स्तोत्रसंहिता 46:10
  • माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात.
    स्तोत्रसंहिता 55:22
  • लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा. देव आपली सुरक्षित जागा आहे.
    स्तोत्रसंहिता 62:8
  • परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
    यशया 26:3
  • परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “तुम्ही मला शरण आलात, तर तुम्ही वाचाल. शांतता आणि विश्वास हीच तुमची शक्ती आहे.”पण तुम्हाला हेच नको आहे.
    यशया 30:15
  • तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील.
    यशया 32:17
  • पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.
    यशया 40:31
  • परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल.
    यिर्मया 17:7
  • परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो. परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
    विलापगीत 3:25, 26
  • जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन. माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”.
    मत्तय 11:28-30
  • जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंत:करण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.
    फिलिप्पैकरांस 4:7
  • आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
    2 तीमथ्थाला 1:12
  • तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,
    1 पेत्र 5:7