सामर्थ्य


  • तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी; तुम्ही असे कराल तर माझ्या कृपेने तुम्हाला भरपूर अन्नपाणी मिळेल मी तुमच्या मधून रोगराई काढून टाकीन.
    निर्गम 23:25
  • “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो:तू करुणा भाकलीस ती मी ऐकली आणि तुझी अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.
    2 राजे 0:5
  • दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता.
    1 इतिहास 11:9
  • परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
    स्तोत्रसंहिता 21:1
  • त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस, देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
    स्तोत्रसंहिता 21:4
  • देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
    स्तोत्रसंहिता 21:6
  • परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
    स्तोत्रसंहिता 34:20
  • देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले. आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांढरे झाले आहेत. पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे. मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल आणि महानतेबद्दल सांगेन.
    स्तोत्रसंहिता 71:17, 18
  • त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
    स्तोत्रसंहिता 112:7
  • आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत. आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
    स्तोत्रसंहिता 144:12
  • नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस.
    नीतिसूत्रे 3:23
  • माझ्या प्रिय मित्रा, जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझेचांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो.
    3 योहान 1:2
  • कारण तुम्हाला देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरुद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हाला मदत करणारा आहे.’
    अनुवाद 20:4
  • दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील
    1 इतिहास 28:20
  • अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.
    2 इतिहास 32:8
  • मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
    स्तोत्रसंहिता 8:2
  • परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो. देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो. देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो.
    स्तोत्रसंहिता 18:29, 30, 32
  • काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
    स्तोत्रसंहिता 20:7
  • मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल. परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.
    स्तोत्रसंहिता 27:13, 14
  • परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो. परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो. परमेश्वर त्याला वाचवतो.
    स्तोत्रसंहिता 28:7, 8
  • परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
    स्तोत्रसंहिता 37:39
  • कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो.
    स्तोत्रसंहिता 73:26
  • जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात, ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
    स्तोत्रसंहिता 84:5, 7
  • परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
    स्तोत्रसंहिता 118:14
  • मी खिन्न आणि दमलेलो आहे. आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव.
    स्तोत्रसंहिता 119:28
  • परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस. त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात पण तू त्यांचे रक्षण करतोस. परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस. पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात. पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते. घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.
    यशया 25:4
  • परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.
    यशया 40:29
  • काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.
    यशया 41:10
  • येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हाणाला, मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”
    मत्तय 19:26
  • यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?
    रोमकरांस 8:31
  • यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?
    2 करिंथकरांस 3:5
  • ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात.
    2 करिंथकरांस 10:4
  • पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे. या कारणासाठी ख्रिस्ताकरिता अशक्तपणात आनंद करतो. अपमानात, कठीण परिस्थितित, छळात, अडचणीच्या वेळी, कारण जेव्हा मी अशक्त, तेव्हा मी सशक्त असतो.
    2 करिंथकरांस 12:9, 10
  • मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी.
    इफिसकरांस 3:16
  • शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा.
    इफिसकरांस 6:10
  • जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्यार द्धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.
    फिलिप्पैकरांस 4:13
  • माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्येजो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे.
    1योहान 4:4
  • खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”
    यहोशवा 1:9
  • सर्वशक्तिमान परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या. “मी त्यांना शिक्षा करणार नाही असे ते लोक म्हणाले म्हणून, यिर्मया, मी जे शब्द तुला देतो, ते आगीप्रमाणे असतील, ते लोक लाकडाप्रमाणे असतील, ती आग त्यांना पूर्णपणे जाळून टाकील.”
    यिर्मया 5:14
  • परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्यवान करील ते देवासाठी व त्याच्या नावासाठी जगातील. परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.
    जखऱ्या 10:12
  • कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
    मत्तय 10:20
  • परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हांला शक्ति मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माइयाविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहूदीया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.”
    प्रेषितांचीं कृत्यें प्रेषितांचीं कृत्यें 1:8
  • यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते.
    प्रेषितांचीं कृत्यें प्रेषितांचीं कृत्यें 4:13
  • कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
    1 करिंथकरांस 1:18
  • माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते. यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यवर असावा.
    1 करिंथकरांस 2:4, 5