धडा 122

“आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,” असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
2 आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
3 हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
4 कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.
5 राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.
6 यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,
7 अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”
8 तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”. माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
9 आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.