धडा 149

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3 त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.
7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या. त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8 देवाचे लोक त्या राजांना आणि महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील. देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात. परमेश्वराचे गुणगान करा